बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान हा सध्या त्याच्या पठाण या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. पठाण या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता जॉन अब्राहम हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. नुकताच पठाण चित्रपटाचा ट्रेलर दुबईमधील बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) झळकला आहे. पठाणच्या ट्रेलरच्या बुर्ज खलिफावरील स्क्रिनिंग प्रोग्रॅमला शाहरुख खाननं देखील हजेरी लावली होती. यश राज फिल्म्सच्या ट्विटर अकाऊंटवरुन शाहरुखचे बुर्ज खलिफावरील स्क्रिनिंग प्रोग्रॅममधील फोटो शेअर करण्यात आले आहेत. पठाणचा ट्रेलर बुर्ज बुर्ज खलिफावर झळकल्यानंतर आता शाहरुखचे चाहते हा चित्रपट रिलीज होण्याची उत्सुकतेने वाट बघत आहेत. पठाण या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता जॉन अब्राहम हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत पठाण हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे पठाण या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे.