अमेरिकेची आर बोनी गॅब्रिएल ही 'मिस युनिव्हर्स-2022' या स्पर्धेची विजेती ठरली आहे.



15 जानेवारी रोजी न्यू ऑर्लिन्स येथे झालेल्या समारंभात 71 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धाच्या विजेतीची घोषणा करण्यात आली.



अमेरिकेच्या (USA) आर बोनी गॅब्रिएलनं मिस युनिव्हर्स 2022 चा मुकुट जिंकला.



'मिस युनिव्हर्स-2022' या स्पर्धेत 80 हून अधिक ब्युटी क्वीन्स सहभागी झाल्या होत्या.



आर बोनी गॅब्रिएल ही 28 वर्षाची आहे.



आर बोनी गॅब्रिएल ही ह्यूस्टन, टेक्सास (Texas) येथील फॅशन डिझायनर आहे.



आर बोनी गॅब्रिएलचा जन्म 20 मार्च 1994 रोजी सॅन अँटोनियो, टेक्सास येथे झाला.



आर बोनी गॅब्रिएलची आई अमेरिकन आणि वडील फिलिपिनो आहेत.



मिस युनिव्हर्स-2022 च्या विजेतीला जो क्राऊन घालण्यात आला आहे, तो अतिशय खास आहे. फोर्स फॉर गुड (Force for Good) असं नाव या मुकुटाला देण्यात आलं आहे.



सध्या जगभरातील लोक आर बोनी गॅब्रिएलला शुभेच्छा देत आहेत.