अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या पठाण या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.
पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
पठाण या चित्रपटाची शाहरुखचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.
पठाण या शाहरुखच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
शाहरुखचे चाहते आता पठाणच्या 'फर्स्ट डे फर्स्ट शो' ची जय्यत तयारी करत आहेत.
रिपोर्टनुसार, शाहरुख खानचे 50000 हून अधिक चाहते 'पठाण'चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणार आहेत.
SRK युनिव्हर्स हा शाहरुखचा फॅन क्लब भारतातील 200 हून अधिक शहरांमध्ये 'पठाण'च्या फर्स्ट डे फर्स्ट शोचे आयोजन करणार आहे.
SRK युनिव्हर्स फॅन क्लबचे सह-संस्थापक यश परायणी यांनी सांगितलं, 'SRK युनिव्हर्स 200 हून अधिक शहरांमध्ये 'पठाण' च्या फर्स्ट डे फर्स्ट शोचे आयोजन करत आहे.'
पठाण हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.
250 कोटींच्या बजेटमध्ये 'पठाण' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.