अभिनेत्री श्रिया ही ओटीटीवरील वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. 'क्रॅकडाऊन', 'द ब्रोकन न्यूज' आणि 'गिल्टी माइंड्स' या वेब सीरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली. श्रिया पिळगावकरनं नुकतेच तिच्या मराठमोळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. निळी साडी, गोल्डन ज्वेलरी आणि गजरा अशा लूकमधील फोटो श्रियानं शेअर केले आहेत. श्रियाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. श्रियाच्या या मराठमोळ्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. श्रियाची ताजा खबर ही वेब सीरिज 6 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आली. ताजा खबर या वेब सीरिजमध्ये श्रियाबरोबरच भुवन बम, शिल्पा शुक्ला यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. श्रिया सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. श्रिया ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.