अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांचा 'लायगर' चित्रपट 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे सध्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्यस्त आहेत 'लायगर' चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे 'लायगर' चित्रपटासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत नुकतेच विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचे चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत या फोटोंमध्ये विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करताना दिसत आहेत या फोटोंमध्ये अनन्या पांडे येलो क्रॉप टॉप आणि डेनिम जींन्समध्ये दिसत आहे तर विजय देवरकोंडा या फोटोंमध्ये ब्लॅक टी-शर्ट डेनिम जींन्समध्ये दिसत आहे मुंबईतील वाहतूक कोंडी टाळत या दोघांनी मुंबई लोकलने प्रवास केला आहे रेल्वे स्टेशन आणि ट्रेनमधील या दोघांचे फोटो सध्या चर्चेचा विषय आहे