अभिनेत्री सान्या मल्होत्रा आतापर्यंत निवडक सिनेमांमध्ये झळकली आहे. असं असूनही तिचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यामुळे तिच्या फोटोजवर भरभरुन लाईक्स-कमेंट्स येत असतात. ती देखील तसेच अतिशय सुंदर फोटोज पोस्ट करत असते. विशेष म्हणजे ती वेगवेगळ्या लूक्समध्ये फोटो शेअर करते. यावेळी साडी, कुर्ता तर वेस्टर्न वनपीस असे वेगवेगळे आऊटफिट असतात. तिच्या आगामी सिनेमाची चाहते वाट पाहत आहेत. सद्यस्थितीला सान्याचे इन्स्टाग्रामवर 2.7 मिलीयन इतके फॉलोवर्स आहेत. सान्याच्या सर्व लूक्समधील फोटो चाहत्यांना आवडतात. सान्या मल्होत्रा दंगल, बधाई हो अशा सिनेमांमधून प्रसिद्धीला आली आहे.