बॉलिवूड चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या ‘डार्लिंग्स’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.



या दरम्यान रोज तिचा नवा लूक समोर येत आहे.



नुकतेच ट्रेलर लाँचला उपस्थित राहिलेल्या आलिया भट्टने या सोहळ्यासाठी खास क्लासी आऊटफिट निवडला होता.



या आऊटफिटमध्ये तिचा बेबी बंप शोधणेही कठीण होते.



आलियाने या नव्या फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.



यात आलियाने लिंबू कलरच्या पँट सूटमध्ये फोटोशूट केले आहे. या आऊट फिटमध्ये आलियाचा बेबी बंप अजिबात दिसत नाहीय.



फोटो शेअर करत आलियाने लिहिले की, ‘मी पोज देत आहे, तुम्ही डार्लिंग्सचा ट्रेलर पाहा.’



आलिया भट्टच्या ‘डार्लिंग्स’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला, ज्याचे खूप कौतुक होत आहे.



हा चित्रपट 5 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.



प्रेग्नन्सीच्या घोषणेनंतर आलिया भट्ट पहिल्यांदा ‘डार्लिंग्स’च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये सार्वजनिकपणे दिसली होती.