बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असते. मलायकाबद्दल चाहत्यांना अनेक गोष्टी माहिती आहेत. मलायकाला स्वयंपाक करायला आणि खायला आवडते हे गोष्ट अनेकांना माहित नाही. मलायका अनेकदा तिच्या सोशल मीडियावर अनेक खाद्यपदार्थांबद्दल पोस्ट करत असते. मलायकालाघरचं जेवण खूप आवडते. खिचडी, पास्तापासून ते स्वादिष्ट सँडविचपर्यंत अनेक पदार्थ बनवायला मलायकाला आवडते. अलीकडे मलायकाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामधून तिच्या स्वयंपाकाबद्दल माहिती मिळते. मलायकाने शेअर केलेल्या फोटोंमधील स्वादिष्ट पदार्थ पाहून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. मलायकाच्या या फोटोंवर चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले आहेत. मलायकाच्या पोस्टनंतर चाहत्यांनी तिचे कौतुक देखील केले आहे.