बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनला सुरुवातीपासूनच अभिनय क्षेत्रात करिअर करायचे होते. यासाठी विद्याला मोठा संघर्ष करावा लागला.
'परिणिता' चित्रपटानंतर तिचा संघर्ष संपला. लोक काय म्हणतील याची पर्वा न करणारी ही अभिनेत्री आज खूप सुंदर आयुष्य जगत आहे.
विद्या बालनला सुरुवातील दक्षिणात्या चित्रपटसृष्टीत अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत एक मल्याळम चित्रपट मिळाला होता.
विद्याने 'हम पाँच' या टीव्ही मालिकेत नशीब आजमावले. यानंतर तिने छोट्या पडद्यावरील अनेक जाहिरातींमध्ये काम केले.
यातील बहुतांश जाहिराती प्रदीप सरकार यांनी दिग्दर्शित केल्या होत्या. विद्या प्रदीप सरकार यांना दादा म्हणायची.
यादरम्यान विद्याने विनोद चोप्राच्या आगामी 'परिणीता' चित्रपटासाठी ऑडिशन दिले. 'परिणिता' या चित्रपटासाठी विद्याला 60 हून अधिक स्क्रीन टेस्ट द्याव्या लागल्या होत्या.
एका क्षणी, तिला वाटले की हा चित्रपटासाठी देखील ती नाकारली जाईल. मात्र या चित्रपटासाठी अखेर विद्या बालनची निवड झाली
2005 मध्ये आलेल्या 'परिणिता' या चित्रपटाने विद्या बालनचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. 13 वर्षांच्या कारकिर्दीत विद्याने बॉलिवूडमध्ये आपली पकड मजबूत केली.