अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी त्याच्या रिलेशनशिपची जाहीर घोषणा केल्यापासून ते अगदी आता त्यांच्या लग्नानंतरही प्रत्येक वेळी प्रेक्षकांचं मन जिंकलय.
ही जोडी नेहमीच त्यांचे फोटो सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचवत असते.
नुकतंच या दोघांनी सोशल मीडियाद्वारे एक खुशखबर दिली आहे.
हा फोटो शेअर करत या दोघांनी त्यांच्या मुंबईतल्या नव्या घराची घोषणा केली आहे.
'To the new beginnings! To the first house in Mumbai.🎉🎉' असं कॅप्शन देत मिताली आणि सिद्धार्थने हा फोटो शेअर केला आहे.
अनेक चाहत्यांकडून तसेच मित्रपरिवाराकडून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.