समंथा कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण आहे. समंथा ही सर्वाधिक मानधन घेण्याऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. पुष्पामधील 'ओ अन्टावा' या गाण्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. काही महिन्यांपूर्वीच तिने नागा चैतन्यासोबत घटस्फोट घेतला. समंथाचे हैदराबादमध्ये अलिशान घर आहे. तिच्याकडे लग्जरी गाड्यांचे मोठे कलेक्शन आहे. तिच्याकडे बीएमडब्लू 3 सीरिज, बीएमडब्लू एक्स 5 आणि जग्वार या महागड्या गाड्या आहेत. एका रिपोर्टनुसार, समंथाकडे 80 कोटींची संपत्ती आहे.