अभिनेता सलमान खानला बॉलिवूडचा सुपरस्टार म्हटले जाते.

बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या अडचणींमध्ये काहीशी वाढ झाली आहे.

सलमान खानला तातडीचा दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाने नकार दिला आहे.

जागेवरील अतिक्रमणाच्या मुद्यावरून वाद असताना नाहक वैयक्तिक पातळीवर आरोप होत असल्याचा सलमान आपल्या याचिकेत दावा केला होता.

हे आरोप थांबवून सोशल मीडियावरील आपल्याविरोधातील पोस्ट आणि व्हिडीओ हटवण्याची सलमान खाननं मागणी केली होती.

अंधेरी न्यायालयाकडूनही सलमानला समन्स

साल 2019 मध्ये एका पत्रकाराला धमकावल्याप्रकरणी मुंबईतील अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने सलमान खानला समन्स जारी केले आहेत.

या समन्समध्ये सलमानसह त्याच्या अंगरक्षक नवाज शेखला कोर्टासमोर हजर राहण्याचे निर्देश दिलेले आहेत.