अभिनेत्री विदुला चौगुलेनं तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विदुलाच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे रेड कलरचा ड्रेस, ब्लॅक हिल्स आणि डोल्डन इअरिंग्स अशा लूकमधील फोटो विदुलानं शेअर केले आहेत. विदुलाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. Nothing can dim the light that shines from within असं कॅप्शन विदुलानं या फोटोंना दिलं आहे. विदुला ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. जीव झाला येडापिसा या मालिकेमुळे विदुलाला विशेष लोकप्रियता मिळाली जीव झाला येडापिसा या मालिकेत विदुलानं सिद्धी ही भूमिका साकारली बॉईजः3 चित्रपटामध्ये देखील तिनं प्रमुख भूमिका साकारली. विदुलाच्या आगामी मालिका आणि चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.