सरगम ​​कौशलने अमेरिकेत आयोजित केलेल्या मिसेस वर्ल्ड 2022-23 या स्पर्धेचे विजेते पद पटकावलं आहे



लास वेगसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘मिसेस वर्ल्ड 2022’ या स्पर्धेत 63 देशांमधील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.



भारतात सरगमने 21 वर्षांनंतर हा मुकुट भारतात आणला आहे.



सध्या देशभरातील लोक सरगमला शुभेच्छा देत आहेत.



सरगम ही जम्मू-काश्मिरची असून सध्या ती मुंबईमध्ये राहते.



तिनं इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तिने विशाखापट्टणम येथील शाळेत शिक्षिका म्हणूनही काम केले आहे.



पुढे शिक्षकी पेशा सोडून सरगमनं मॉडेलिंग क्षेत्रात एन्ट्री केली.



मिसेस इंडिया वर्ल्ड 2022 हा किताब देखील सरगमनं जिंकला.



भारतीय नौदलातील अधिकारी आदित्य मनोहर शर्मा यांच्याशी 2018 मध्ये सरगमनं लग्न केलं.



सगरम ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. ती वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. सगरमला तीस हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.