अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या पठाण या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.
शाहरुखनं पठाण चित्रपट रिलीज होण्याआधी ट्विटरवरील काही युझर्सच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहे.
एका नेटकऱ्यानं शाहरुखला प्रश्न विचारला, 'माझं लग्न 26 जानेवारीला ठारलं आहे, काय करु?' यावर शाहरुखनं उत्तर दिलं, 'लग्न कर, हनिमुनच्या हॉलिडेमध्ये चित्रपट बघ'
'हॅलो शाहरुख सर, तुम्ही प्लिज तुमचा व्हॉट्सअॅप नंबर शेअर करता का? तुमच्यासोबत बोलून नंतर नंबर डिलीट करतो.' चाहत्याच्या या प्रश्नाला शाहरुखनं रिप्लाय दिला, 'मी मेसेज आणि फोनवर जास्त बोलत नाही'
'तू स्वदेस, चक दे इंडिया यासारख्या चित्रपटांची निर्मिती का करत नाहीस?' यावर शाहरुखनं रिप्लाय दिला, 'मी अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे, अजून किती करु? '
शाहरुखचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पठाण हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
सिद्धार्थ आनंदने पठाण या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे.
तसेच शाहरुखचा 'जवान' हा आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
पठाण व्यतिरिक्त शाहरुख हा राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' या आगामी चित्रपटामध्येही प्रमुख भूमिका साकारणार आहे.