विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्या यांच्या लग्नासोहळ्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. 7 डिसेंबरला संगीताने विवाहसोहळ्याची सुरुवात झाली. 8 डिसेंबरला मेहेंदी आणि 9 डिसेंबरला शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. सवाई माधोपूरच्या किल्ल्यामध्ये विकी आणि कतरिनाचा लग्न सोहळा पार पडणार आहे. सध्या अशी चर्चा होत आहे की, विकी आणि कतरिना बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माच्या सीक्रेट वेडिंगची आयडिया कॉपी केली आहे. 11 डिसेंबर 2017 रोजी विराट-अनुष्काने इटलीत लग्नगाठ बांधली. विराट आणि अनुष्काची सीक्रेट वेडिंग आयडियाचा वापर कतरिना आणि विकी त्यांच्या लग्नात करणार आहेत, असं म्हणलं जात आहे. विराट आणि अनुष्काची सीक्रेट वेडिंग आयडियाचा वापर कतरिना आणि विकी त्यांच्या लग्नात करणार आहेत, असं म्हणलं जात आहे. कतरिना आणि विकीनं पाहुण्यांना लग्नात मोबाईल फोन न वापरण्याची अट ठेवली आहे.