महाराष्ट्रात येत्या महिन्यात एक मोठा विवाह पार पडणार आहे. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील ठाकरे घराण्याची सून होणार आहे. अंकिताचा विवाह निहार बिंदूमाधव ठाकरे याच्याशी होणार आहे. येत्या 28 डिसेंबरला मुंबईमध्ये हा विवाह पार पडणार आहे. अंकिता हर्षवर्धन यांची कन्या असण्यासोबत स्वत:ही राजकारणात सक्रिय आहे. अंकिता पाटील ही पुणे जिल्हा परिषदेची सदस्य आहे. अंकिता काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आली आहे. काँग्रेसच्या चिन्हावर निवडूनही अंकिता सध्या भाजपशी जवळीक साधताना दिसत आहे.