कतरिना-विकीच्या हळदीचे खास क्षण; काही क्षणात फोटो व्हायरल! अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. राजस्थानच्या सवाई माधोपूर सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला. कतरिना कैफ विकी कौशलच्या लग्नाच्या फोटोंना 20 मिनिटांत 1 मिलियन लाइक्स मिळाले होते, आता त्यांच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत. विकी आणि कतरिनाने नुकतेच त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर लग्नसोहळ्यातले हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. (Photo : @katrinakaif/ Instagram)