मुस्लिम आरक्षण, वक्फ बोर्डाच्या जमिनी आणि इतर मागण्यांसाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वाखाली एमआयएमची रॅली औरंगाबादहून मुंबईच्या दिशेनं निघाली.

मात्र या रॅलीला मुंबईत प्रवेश मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय.

स्वतः राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना हे स्पष्ट केलंय.

मुंबई पोलिसांनी काढलेला आदेश अंतिम समजायचा अशी प्रतिक्रिया गृहमंत्र्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय सभा आणि रॅलींना बंदी घालण्यात आलीय. त्यामुळं एमआयएमच्या रॅलीला मुंबईत एन्ट्री मिळणं कठीण दिसतंय.

दरम्यान औरंगाबाद आणि अहमदनगर सीमेवर पोलिसांनी काही काळासाठी रॅली अडवली होती.

मात्र अटी-शर्तींसह रॅलीतील काही वाहनं सोडण्यात आलीय..