कतरिना कैफ आणि विकी कौशलचे लग्नानंतरचे पहिले फोटो समोर आले आहेत. राजस्थानच्या सवाई माधोपूर सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला. कतरिना आणि विकीच्या लग्नाला हजेरी लागवणाऱ्या पाहुण्यांसाठी काही खास नियम आणि अटी ठेवण्यात आल्या होत्या. कतरिना आणि विकीनं पाहुण्यांना लग्नात मोबाईल फोन न वापरण्याची अट ठेवली होती. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह शाही आणि पारंपारिक पद्धतीने पार पडला. कतरिना कैफ विकी कौशलच्या लग्नाच्या फोटोंना 20 मिनिटांत 1 मिलियन लाइक्स मिळाले आहेत.