बिग बॉस मराठीच्या घराचे रूपांतर लिलिपुट नगरात करण्यात आले आहे तेव्हापासून सदस्यांची झोप उडाली आहे. घरामध्ये हुकूमशहा कठीण कठीण टास्क या सदस्यांना सोपवत आहेत आणि त्यामुळे सदस्यांची तारांबळ उडत आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या साप्ताहिक कार्य सुरू आहे. घरामध्ये हुकूमशहांचे राज्य आहे. आणि त्यामध्ये सदस्य वेगवेगळे टास्क पूर्ण करत आहेत. घरातील सदस्यांना बर्याच आव्हांनाना सामोरे जावे लागत आहे. सदस्यांना शिक्षादेखील भोगावी लागत आहे. आज उत्कर्ष आणि विशालच्या संयमाची कसोटी लागणार आहे.