सगळ्यात कमी शाकाहारी व्यक्ती रशियात आहेत. या देशात शाकाहारींची संख्या एक टक्का इतकी आहे. पोर्तुगालमध्ये शाकाहारी दुर्मिळ असून 1.2 टक्के लोक शाकाहारी आहेत. स्पेनमध्ये शाकाहारींची संख्या 1.4 टक्के इतकी आहे. दक्षिण कोरियात तीन टक्क्यांहून कमी प्रमाण आहे. थायलंडमध्ये शाकाहारींची संख्या 3.3 टक्के आहे. चीनमध्ये शाकाहार करणाऱ्यांची संख्या 4 ते 5 टक्के इतकी आहे. ग्रीसमध्ये चार टक्के शाकाहारी असून आयर्लंडमध्ये 4 ते 8 टक्के इतके प्रमाण आहे. ग्रेट ब्रिटन, अमेरिकेत शाकाहारींची संख्या 5 टक्क्यांच्या आसपास आहे. फ्रान्स, युक्रेन सारख्या देशात शाकाहारींची संख्या 5.2 टक्के इतकी आहे. जपानमध्ये शाकाहारींची संख्या 9 टक्के आहे. ऑस्ट्रेलियात 12.1 टक्के आणि अर्जेंटिनात 12 टक्के लोक शाकाहारी आहेत.