'महाराष्ट्राची महाअप्सरा' अशी ओळख असलेली अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवारने आपल्या अदाकारीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे.
नृत्या बरोबरच छोट्या पडद्यावरील 'वाहिनीसाहेब' ही व्यक्तिरेखा असो
माधुरी पवारने आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाने प्रेक्षक आणि समीक्षकांची दाद मिळविली आहे.
अभिनेत्री माधुरी पवारने कोणत्याही एका प्रकारच्या भूमिकेत 'टाइप कास्ट' न होता आपल्या दमदार अभिनयातून आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत.
आता माधुरीच्या चाहत्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.
माधुरी लेखक, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी बहुचर्चित, मराठी-हिंदीसह पाच भाषांमध्ये निर्मिती होत असलेल्या
वेडात वीर दौडले सात' या भव्य ऐतिहासिक सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असल्याची माहिती समोर आली आहे.
माधुरी पवार नेमकी कोणती व्यक्तिरेखा साकारणार हे अद्याप समोर आलेलं नाही.
तगडी स्टारकास्ट असलेला ‘वेडात मराठे वीर दौडले सात’
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमाच्या माध्यमातून अक्षय कुमार मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.