आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने मधुबाला यांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. मधुबाला यांचे खरे नाव 'मुमताज जहान बेगम नहलवी' असे आहे. बेबी मुमताज या नावानेदेखील मधुबाला ओळखल्या जायच्या. बाबुराव पटेल आणि डॉ. सुशीलाराणी पटेल या दांपत्याचा मधुबाला यांच्यावर विशेष लोभ होता. डॉ. सुशीलाराणी पटेल यांनीच बेबी मुमताजचे 'मधुबाला'असे नामकरण केले होते. मधुबाला यांनी इंग्रजी संभाषणाचे धडे सुशीलाराणी पटेल यांच्याकडून घेतले होते. अभिनेत्री मधुबाला यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे 'मुघम-ए-आझम' पासून 'चलती का नाम गाडी' पर्यंत अनेक सिनेमे चाहते ओटीटीवर पाहू शकतात. 14 फेब्रुवारी 1933 रोजी जन्मलेल्या मधुबाला यांनी आपल्या अभिनयाने सर्वांनाच घायाळ केलं आहे. 'मुघल-ए-आझम' या सिनेमामुळे मधुबाला 'अनारकली' या नावाने घराघरांत लोकप्रिय झाल्या. मधुबाला यांनी हिंदी सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे.