सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्या विवाहानिमित्त रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. अभिनेत्री कृति सेननदेखील या सोहळ्यासाठी हजर राहिली होती. गोल्डन साडीत कृति सेननचा ग्लॅमरस अंदाज दिसून आला. कृति सेननच्या घायाळ करणाऱ्यां अदांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. कृति सेननने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही या गोल्डन साडीतील फोटो शेअर केलेत. कृतिच्या ट्रान्सपेरेंट साडीत तिचा कर्वी लूक दिसून आला. कृतिने गोल्डन साडीसह बोल्ड स्लिवलेस ब्लाउज कॅरी केला होता. लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलकासा मेकअप आणि इअर रिंग घातले होते कृतिच्या या ग्लॅमरस लूकने चाहते घायाळ झाले आहेत.