'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या शूटिंगदरम्यान अक्षया आणि हार्दिकची चांगली मैत्री झाली. एका मुलाखतीत हार्दिक म्हणाला,अक्षया आणि मी खूप चांगले मित्र होतो. पण मी तिला कधीच लग्नासाठी प्रपोज केलं नाही. हार्दिक पुढे म्हणाला,आईच्या आग्रहाखातर एक दिवस अखेर मी अक्षयासोबत बोलयचं ठरवलं. हार्दिक अक्षयाला म्हणाला,'आपल्या दोघांचं लग्न व्हावं, अशी माझ्या आईची इच्छा आहे. हार्दिकला अक्षयाने लगेचच होकार दिला. ती म्हणाली,'मला काही अडचण नाही, तू एकदा माझ्या घरी येऊन आई-बाबांसोबत बोल. हार्दिक-अक्षयाने अक्षय्य तृतीयेदिवशी साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी 2 डिसेंबर 2022 रोजी लग्नबंधनात अडकले. हार्दिक-अक्षयाचा पुण्यातील ढेपे वाड्यातशाही विवाहसोहळा पार पडला. राणदा आणि पाठकबाईंची रिल जोडी आता खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जोडीदार झाल्याने त्यांच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. हार्दिक-अक्षयाचे लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.