'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटातील स्टार कास्टचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.



चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका अक्षय कुमार साकारणार आहे.



अभिनेता प्रवीण तरडे हा प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारणार आहे. त्याच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.



छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता हार्दिक जोशी हा 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटात मल्हारी लोखंडे ही भूमिका साकारणार आहे.



बिग मराठी सीझन 3 चा विजेता विशाल निकम हा या चित्रपटात चंद्राजी कोठार ही भूमिका साकारत आहे.



अभिनेता विराट मडके हा या चित्रपटात जिवाजी पाटील ही भूमिका साकारत आहे.



बिग बॉस-3 फेम अभिनेता उत्कर्ष शिंदे या चित्रपटात सूर्याजी दांडकर ही भूमिका साकारणार आहे.



महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर हा या चित्रपटात दत्ताजी पागे ही भूमिका साकारत आहे.



अभिनेता जय दुधाणेला बिग बॉस सीझन 3 मुळे लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तो तुळजा जामकर ही भूमिका साकारत आहे.



वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत.