शाहरुख खान बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी आहे. किंग खान एका दिवसाला 1.4 कोटी कमावतो. शाहरुख खानची एकूण संपत्ती 5 हजार 593 कोटी आहे. शाहरुख खानची प्रॉपर्टी देश-विदेशात आहे. शाहरुखचं स्वतःचं 'रेड चिलीज' नावाचं प्रोडक्शन हाऊस आहे. मुंबईसह दुबईतही बादशाहची प्रॉपर्टी आहे. बायजू आणि किडजानिया या कंपन्यांमध्ये देखील शाहरूखची गुंतवणूक आहे. बड्या कंपन्यांच्या जाहिरातींमध्येदेखील शाहरूखने काम केलं आहे. रिपोर्टनुसार एका जाहिरातीसाठी शाहरुख 3.5 से 4 करोड रुपये मानधन घेतो. शाहरूखची वार्षिक कमाई 38 मिलियन म्हणजेच जवळपास 284 करोड रूपये आहे.