अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे.



बिग बींना आता X श्रेणीची सुरक्षा मिळणार आहे.



अमिताभ बच्चन यांना यापूर्वी मुंबई पोलिसांची सामान्य सुरक्षा देण्यात आली होती.



पण आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून आता त्यांना X श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.



X श्रेणी सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक 24 तास तैनात असतात.



आता एक्स ग्रेड सुरक्षेअंतर्गत बिग बी यांच्या सुरक्षेसाठी आणखी 2 गार्ड तैनात केले जातील, त्यापैकी एक पीएसओ आहे.



अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेसाठी आता 3 पोलीस वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तैनात राहणार आहेत.



बिग बी हे वेगवेगळ्या चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात.



काही दिवसांपूर्वी त्यांंचे ब्रह्मास्त्र आणि गुडबाय हे चित्रपट रिलीज झाले.



अमिताभ यांचा 'ऊंचाई' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.