आनंदाचा आणि प्रकाशाचा उत्सव म्हणजे दिवाळी (Diwali 2023). पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितल्याप्रमाणे, यावर्षी दिवाळीची पहिली पणती लावावी ती वसुबारसच्या दिवशी. 9 नोव्हेंबरला वसुबारसा सण साजरा करावा. गाईचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहित आहे आणि म्हणून गाईचं पूजन करणं महत्त्वाचं आहे. वसुबारसच्या दिवशी वासरासह असलेल्या गाईचं पूजन करावं. गाईला चारा खायला घालणे आणि तिचा सांभाळ करणारा जो गोपालक आहे त्याला धान्य देणे हा छोटासा विधी आहे. या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. भरपूर कृषी उत्पादन व्हावे आणि सुख लाभावे म्हणून वसुबारसची पूजा केली जाते. वसुबारस (गोवत्स द्वादशी) गुरूवार 9 नोव्हेंबर मुहूर्त सायंकाळी 05.31 मिनिटे ते 08.09 मिनिटांपर्यंत