रांगोळी काढण्यासाठी केवळ रांगोळी आणि रंगांचाच नाहीतर तुम्ही फुला-पानांचाही वापर करू शकता.
फुलं पानं वेगवेगळ्या डिझाइन्समध्ये मांडून तुम्ही सुंदर रांगोळी तयार करू शकता.
सुरेख रांगोळीभोवती पण्यत्यांची आरास केल्यावर रांगोळीची शोभा आणखी वाढते.
ठिपक्यांची रांगोळी, संस्कार भारती रांगोळी यांसारख्या रांगोळ्यांसोबतच तुम्ही वेगवेगळ्या डिझाइन्सच्याही रांगोळ्या काढू शकता.
दिवाळीत रांगोळी काढून तुम्हीही तुमचे घर सजवू शकता आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकता.
दिवाळीत आकाश कंदील, फराळ, पणत्यांची आरास आणि रोषणाईसोबत रांगोळीही तितकीच महत्त्वाची असते.
दारात किंवा अंगणात काढलेली सुंदर आणि सुरेख रांगोळी लोकांचं लक्षं आकर्षित करते.
दिवाळी निमित्त अंगणात किंवा दारासमोर रांगोळी काढली जाते.
भारतात सणांवर रांगोळी काढण्याची परंपरा खूप जुनी आहे.
रंगीबेरंगी रांगोळीशिवाय घराचे अंगण अपूर्ण वाटते.