1

सायंकाळी झाडू काढणे टाळावे त्यामुळे घरातील सकारात्मक उर्जा बाहेर निघून जाते.

2

तिन्हीसांजेच्या वेळेस कधीही झोपू नये , त्यामुळे स्वास्थ्य बिघडते.

3

तिन्हीसांजेला तुळशीची पाने तोडू नये कारण घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होते.

4

सायंकाळी भांडणे टाळा, वाद विवाद करू नका आणि आनंदी, प्रसन्न रहा.

5

दिवा लावल्यावर लगेचच घराचं मुख्य दार बंद करु नये कारण ती वेळ लक्ष्मीच्या येण्याची असते.

6

संध्याकाळी झाडांना पाणी घालू नये.

7

संध्याकाळच्या वेळी नखे कापू नये.

8

संध्याकाळी कधीही जेवू नये त्यामुळे पोटाच्या समस्या उद्धवतात.

9

संध्याकाळी दूध, दही, मीठ कोणालाही देऊ नका.

10

संध्याकाळच्या वेळी आपण लक्ष्मी देवीची पूजा करतो त्यामुळे संध्याकाळी कोणाला कर्ज देऊ नये आणि घेऊही नये.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.