अभिनेता वरुण धवनचा भेडीया हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
वरुण हा सध्या भेडीया चित्रपटाचं प्रमोशन करत आहे.
चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी वरुण आणि क्रिती यांनी नुकतीच बिग बॉस-16 मध्ये हजेरी लावली.
बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खाननं केलेल्या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले.
बिग बॉस-16 च्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, वरुणला एक टॉय देऊन सलमान म्हणाला, 'हे तुझ्या मुलासाठी' यावर वरुण म्हणाला, 'अजून मुलं झालं नाही' त्यानंतर सलमान म्हणाला, 'लवकरच होईल'
सलमानच्या या वक्तव्यामुळे आता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
वरूण धवनने 24 जानेवारी 2021 रोजी नताशा दलालसोबत लग्नगाठ बांधली.
वरुण आणि नताशाच्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
वरुणच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.