इन्स्टाग्रामवर सानिया मिर्झानं एक स्टोरी पोस्ट केली होती. त्यानंतर सानिया-शोएबचा ब्रेकअप होणार अशी चर्चा सुरू झाली. शोएबचं एका मॉडेलसोबत बोल़्ड फोटोशूट केलं होतं. शोएबचं तिच्यासोबत अफेअर असल्याची चर्चा होती. त्यानंतर सानियाने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत होतं. पण आता या दोघांच्या एका शोची बातमी आलीय. द मिर्झा मलिक शो असं या शोचं नाव आहे. शोएब-सानिया मिर्झा हे शो होस्ट करणार आहेत. त्याच्या प्रमोशनसाठी हे सर्व होतं का असा प्रश्न उपस्थित होतोय. द मिर्झा मलिक शोच्या पहिल्या भागात याचं उत्तर मिळेल.