अभिनेत्री मृणाल ठाकूरचे ट्रेडिशनल लूकमधील सुंदर फोटो समोर आले आहे. या फोटोंमध्ये मृणाल ठाकूर गुलाबी रंगाच्या साडीत फारच ग्लॅमरस दिसत आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूरने अभिनयाची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली. मृणालने छोट्या पडद्यापासून सुरुवात केल्यानंतर बॉलिवूडनंतर तिने आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अभिनयाची जादू दाखवली आहे. मृणाल ठाकूरने 2018 साली 'लव सोनिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मृणाल सध्या 30 वर्षांची असून तिचा जन्म महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात झाला. मृणालचं शालेय शिक्षण जळगाव आणि उच्च शिक्षण मुंबईमध्ये झालं आहे. मृणाल ठाकूरने शाहिद कपूरसोबत 'जर्सी' चित्रपटात झळकली होती. यानंतर ती अभिमन्यू दासानीसोबत 'आंख मिचोली', ईशान खट्टरसोबत 'पीपा' मध्येही दिसणार आहे. सीता रामम या तेलगू चित्रपटातून तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पदार्पण केलं आहे.