अभिनेत्री फातिमा सना शेख ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
फातिमा तिच्या स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.
फातिमा सना शेख ही एका आजाराचा सामना करत आहे.
फातिमा सना शेखनं नुकत्याच एका पोस्टमधून या आजाराबाबत चाहत्यांना माहिती दिली.
इन्स्टाग्रामवरील 'क्यू अँड ए' या सेशनमध्ये नेटकऱ्यांनी फातिमाला काही प्रश्न विचारले.
'क्यू अँड ए' या सेशनमध्ये फातिमानं सांगितलं की, ती एपिलेप्सी या आजाराचा सामना करत आहे.
फातिमानं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, 'मला सपोर्ट करणारे खूप लोक आहे. काही दिवस चांगले असतात पण काही दिवस फारसे चांगले नसतात. माझं कुटुंब मला सपोर्ट करते.'
फातिमा सना शेखनं एक पोस्ट शेअर करुन एपिलेप्सी आजाराबाबत चाहत्यांना माहिती दिली. या पोस्टमध्ये तिनं एपिलेप्सीबाबतचे पाच फॅक्ट्स सांगितले आहेत.
फातिमाने दंगलसोबतच ठग्स ऑफ हिंदूस्थान, लूडो, थार यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले.
फातिमानं लेडिज स्पेशल या मालिकेमध्ये देखील काम केलं आहे.