सामान्य सिगरेट प्रमाणे ई-सिगरेटचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे.



कारण लोकांना वाटते की ई-सिगरेटमुळे फारसे नुकसान होत नाही.



मात्र हे धोकादायक आहे असे अमेरिकेतील एका डाॅक्टरने सांगितले आहे.



ई-सिगरेट सिगरेटपेक्षाही जास्त आरोग्याला हानी पोहोचवते.



ई-सिगरेटमुळे आरोग्याचे मोठे नुकसान होऊन अनेक आजार होऊ शकतात.



असे डाॅ. ब्रायन बाॅक्सर यांनी सांगितले.



त्यांच्या मते ई-सिगरेटमधून येणारी वाफ हानिकारक असते.



ई-सिगरेटच्या वापरामुळे त्यातील रसायन वाफेच्या माध्यमातून फुफ्फुसापर्यंत जाते.



यामुळे ब्राँकायटिस, दमा हे जीवघेणे आजार होऊ शकतात.



शरीरातील रक्तदाबाची पातळी वाढते.