वनिता खरातनं सुमित लोंढेसोबत लग्नगाठ बांधली. वनिता आणि सुमितच्या लग्नसोहळ्यातील लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. वनिताच्या विवाह सोहळ्यातील या खास फोटोमध्ये वनिता आणि सुमितची रोमँटिक केमिस्ट्री दिसत आहे. लग्नसोहळ्यासाठी वनितानं गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची साडी, गोल्डन ज्वेलरी असा खास लूक केला होता. तर सुमितनं विवाह सोहळ्यासाठी पांढरी शेरवानी आणि फेटा असा लूक केला होता. वनिता आणि सुमित यांच्या विवाह सोहळ्याला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या टीमनं हजेरी लावली होती. टेंशन रिलीज करायला शोधले मी फंडे सतरा, सुमित, तूच माझा माहाराष्ट्र, तूच माझी हास्यजत्रा असा उखाणा वनितानं लग्नात घेतला. सुमितनं देखील लग्नात खास उखाणा घेतला. तू दिसतेस खूप सुंदर साडीवर, इथून पुढे तुला फिरवणार माझ्या गाडीवर, असा उखाणा सुमितनं लग्नात घेतला. वनिताचा पती सुमित लोंढे हा एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. तसेच तो व्हिडीओ क्रिएटर असण्यासोबत ब्लॉगरदेखील आहे. वनिताचा लग्नसोहळा पार पडल्यानंतर तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुमित आणि वनिताला शुभेच्छा दिल्या.