बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) सिनेमाचा सध्या बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. पठाण या सिनेमाने आता सिनेमागृहात 10 दिवस पूर्ण केले आहेत. किंग खानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पठाण चित्रपटानं दहाव्या दिवशी 15 कोटींची कमाई केली आहे. दहा दिवसात या चित्रपटानं 379.18 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने 57 कोटींची कमाई करत सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. पहिल्या वीकेंडला या सिनेमाने 300 कोटींचा गल्ला जमवला होता. 'पठाण' या सिनेमात शाहरुख खान, दीपिका पादुकोण. जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. परदेशात 'पठाण'चे खास शो आयोजित करण्यात आले आहेत.