बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचा आज वाढदिवस आहे.

बालकलाकार म्हणून करियरला सुरूवात केलेल्या उर्मिलाने इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली.

उर्मिलाला खरी प्रसिद्धी मिळाली ती चायना गेट या चित्रपटातील छम्मा छम्मा गाण्यामुळं.

या गाण्यासाठी उर्मिलाने तब्बल पाच किलो वजन कमी केलं होतं. शिवाय 15 किलो वजनाचे दागिणे घालून या गाण्यात डान्स केला होता.

उर्मिलाने आज तिचा 49 वा वाढदिवस साजरा केला.

उर्मिलाने रंगीन, खूबसूरत, जानम समझा करो, जुदाई, सत्या यासारख्या अनेक चित्रपटात काम केले.

असं म्हटलं जात की, त्यावेळी यशाच्या शिखरावर असताना उर्मिलाने फक्त दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याच चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला होता.

राम गोपाल वर्मा आणि उर्मिलाचे अफेअर असल्याच्या चर्चा देखील त्यावेळी रंगल्या होत्या.

उर्मिला मातोंडकरने बीआर चोपडा दिग्दर्शित 'कर्म' व श्रीराम लागू यांनी दिग्दर्शीत केलेला 'जाकोल' या मराठी चित्रपटातून बालकलाकार म्हणून करिअरला सुरवात केली.

उर्मिलाने मॉडेल मोहसीन अख्खर मीर यांच्याशी लग्न केले.