अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा विवाह 9 डिसेंबर 2021 रोजी पार पडला.



आता एका मुलाखतीमध्ये विकीनं वैवाहिक जीवनाबद्दल सांगितलं आहे. 'मी परफेक्ट हसबंड नाही', असं या मुलाखतीमध्ये विकी म्हणाला.



एका मुलाखतीमध्ये विकीनं सांगितलं, 'लग्नाआधी एकटं राहणाऱ्यांच्या आयुष्यात लग्नानंतर बरेच बदल होतात. एखादी व्यक्ती तुमच्यासोबत कायमस्वरूपी राहायला लागते, ज्यामुळे त्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घ्यावा लागतो.'



'मी एक परफेक्ट पती किंवा परफेक्ट मुलगा नाही. पण मी रोज परफेक्ट होण्याचा प्रयत्न करतो आणि खूप काही शिकण्याचा प्रयत्न करतो.' असंही विकीनं सांगितलं.



काही दिवसांपूर्वी विकीचा गोविंदा नाम मेरा हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला.



विकी हा त्याच्या सॅम बहादूर या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



विकी आणि कतरिना यांचा विवाह सोहळा पार पडल्यानंतर प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या.



कतरिना आणि विकी हे एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.



विकी सोशल मीडियावर देखील अॅक्टिव असतो.



विकीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.