अभिनेत्री वाणी कपूर सध्या चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आज (23 ऑगस्ट) तिचा वाढदिवस साजरा करत आहे.



तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत तिने फिल्म इंडस्ट्रीतील अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले आहे.



नुकतीच ती रणबीर कपूरच्या चित्रपट 'शमशेरा'मध्ये दिसली होती.



आज अभिनेत्री तिचा 34वा वाढदिवस साजरा करत आहे.



वाणी कपूरने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून पर्यटन विषयात पदवी प्राप्त केली आहे.



शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने जयपूर एका हॉटेलमध्ये इंटर्नशिप देखील केली. यानंतर ती आयटीसी हॉटेलमध्ये काम करू लागली.



दरम्यान तिला चित्रपटांमध्ये काम करण्याची आवड निर्माण झाली. हॉटेलमध्ये सुरु असणारे शूटिंग पाहताना वाणीनेही फिल्मी दुनियेत जाण्याचे ठरवले.



हॉटेलची नोकरी सोडल्यानंतर वाणीने मॉडेलिंगच्या दुनियेत प्रवेश केला. यानंतर तिने अनेक मोठ्या डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केला.



मॉडेलिंगच्या दुनियेतूनच वाणीला चित्रपटांमध्ये प्रवेश मिळाला. 2009मध्ये तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. यादरम्यान तिने चित्रपटांसाठी प्रयत्न करणे सुरूच ठेवले.



यानंतर तिला यशराजच्या ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटामध्ये संधी मिळाली. या चित्रपटात ती सहाय्यक भूमिकेत होती. परंतु, तिने आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले.