छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अवनीत कौर सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे खूप चर्चेत आहे.



अवनीत कौर लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत चित्रपटात झळकणार आहे.



अवनीत सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिचे ग्लॅमरस आणि सुंदर फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.



आता नुकतेच अवनीत कौरने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अवनीत ट्रेडिशनल लूकमध्ये सुंदर दिसत आहे. तिने एका मॅगझिनसाठी हे फोटोशूट केलं आहे.



अवनीतचे सौंदर्य पाहून ती आकाशातून अवतरलेल्या अप्सरेपेक्षा कमी दिसत नाही, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.



अवनीत कौरच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे.



अवनीत कौरचा प्रत्येक लूक चाहत्यांचा पसंतीस उतरतो.



अवनीत कौरने तिचा कोणताही फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्यानंतर काही सेकंदातच व्हायरल होतात.



अवनीत कौर अवघ्या 20 वर्षांची आहे. पण इतक्या कमी वयात तिने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे.



अवनीत कौर लवकरच बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत टिकू वेड्स शेरू या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.