देशाचे गृहमंत्री अमित शाह सध्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत.



या दरम्यान नुकतीच त्यांनी साऊथचा प्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि ‘रामोजी फिल्मसिटी’चे रामोजी राव यांची भेट घेतली.



या भेटीनंतर ट्विट करत अमित शाह यांनी त्यांचे भरपूर कौतुक केले आहे.



सोबतच त्यांनी या भेटीदरम्यानचे काही फोटोही शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.



केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या तेलंगणामध्ये दौऱ्यावर आहेत. त्यांनी हैदराबादमध्ये अभिनेता ज्युनियर एनटीआरची भेट घेतली.



अमित शाह यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ज्युनियर एनटीआर आणि रामोजी राव यांच्यासोबतच्या भेटीचे काही फोटो शेअर केले आहेत.



ज्युनियर एनटीआरसोबतचे हे फोटो शेअर करताना गृहमंत्री अमित शाह यांनी त्याचे कौतुक करत लिहिले की, ‘हैदराबादमध्ये तेलुगू सिनेमातील एक अतिशय प्रतिभावान अभिनेता आणि तेलुगू चित्रपटसृष्टीचे रत्न ज्युनियर एनटीआरसोबत छान संवाद साधला.’



तर, रामोजी राव यांच्या सोबतचे फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, ‘श्री रामोजी राव गरू यांचा जीवन प्रवास चित्रपट उद्योग आणि माध्यमांशी संबंधित लाखो लोकांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे. आज त्यांची हैदराबाद येथील निवासस्थानी भेट घेतली.’



या दौऱ्यादरम्यान अमित शाह यांनी हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीला देखील भेट दिली आणि संस्थापक रामोजी राव यांची भेट घेतली. या भेटीनंतरचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.