गेल्या काही वर्षांपासून क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

क्रेडिट कार्ड वापताना सावधान राहिलं पाहिजे. पण काही ठिकाणी क्रेडिट कार्डचा वापर टाळला पाहिजे.

क्रेडिट कार्डचा वापर करुन एटीएममधून कॅश काढाल, या रकमेवर तुम्हाला 2.5 ते 3.5 टक्के व्याज आकारलं जातं.

विदेशात क्रेडिट कार्डचा वापर केल्यास फॉरेन करन्सी ट्रांजेक्शन शुल्क आकारले जाते.

क्रेडिट कार्ड वापरत असताना क्रेडिट लिमिट नेहमी लक्षात ठेवा.

क्रेडिट लिमिटचा 30 टक्केंपेक्षा जास्त वापर केल्यास सिबिल स्कोरवर वाईट परिणाम पडतो.

क्रेडिट कार्ड बिलामध्ये दोन प्रकारची देय रक्कम असते.

एकूण देय रक्कम आणि किमान देय रक्कम याद्वारे तुम्हाला क्रेडिट कार्डचं बिल भरावं लागतं.

क्रेडिट कार्ड वापरताना बॅलेन्स ट्रान्सफर या पर्यायाचा वापर विचारपूर्वक करा.