सोशल मीडियावर अनेक कलाकार प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळतात त्यातलीच एक आपली लाडकी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित मी सिंधूताई सपकाळ, कँडल मार्च या सिनेमांसहं आधी बसू मग बोलू, नांदी आदी अनेक नाटकांत तिने कामं केली आहेत. तेजस्विनी नेहमीच आपली मतं परखड पणे तिच्या सोशल मीडिया अकाउंट्स वरून मांडत असते. तेजस्विनीने तिच्या अभिनयामुळे रसिक प्रेक्षकांची मनं जिंकलीयेत त्यामुळेच तिची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. नुकतच तेजस्वीनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत. ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसतीये. या फोटो मध्ये तेजस्विनीने ब्लॅक टॉप आणि गोल्डन स्कर्ट घातलाय. त्यावर केलेल्या हेअर स्टाईल मुळे ती अगदी बार्बी डॉल दिसतीये.