अभिनेत्री आणि मिस युनिवर्स उवर्शी रौतेलाच्या सौंदर्याने साऱ्यांनाच भुरळ घातली आहे



तिने तिच्या सौंदर्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची शान वाढवली आहे



उर्वशी नुकतीच अरब फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती.अरब फॅशन वीकमध्ये दोनदा उपस्थिती लावणारी पहिली भारतीय ठरली आहे.



या फॅशन वीकमध्ये उर्वशी तिच्या गाऊनमुळे अधिकच चर्चेत आली आणि त्याच कारण म्हणजे त्याची किंमत 40 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे



अरब फॅशन वीकमध्ये उर्वशी रौतेलाने दुबईस्थित लक्झरी फॅशन डिझायनर फर्ने वन अमांटोने डिझाइन केलेला गोल्डन हाय-थाई स्लिट गाऊन परिधान केला होता



उर्वशीचा हा ड्रेस बनवताना, शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला आहे



या ड्रेसमध्ये कोणत्याही प्रकारच्या कपड्याचा वापर केला नसून, कागदावर सोन्याच्या तारांचा वापर केला



उर्वशीने या गाऊनसोबत हेवी एम्बिलेटेड हेड अ‍ॅक्सेसरीज देखील घातली होती, ज्यामुळे संपूर्ण लूक आकर्षक दिसत होता