अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिने या ‘बिग बॉस 15 शोचे विजेतेपद पटकावले आहे. प्रेक्षकांना आणि चाहत्यांना तेजस्वी एक अभिनेत्री म्हणूनच माहीत आहे. परंतु, ही अभिनेत्री इंजिनियरदेखील आहे, हे फार कमी लोकांना माहीत असेल. तेजस्वी प्रकाशचा जन्म 10 जून 1992 रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे झाला होता. तेजस्वी प्रकाशच्या वडिलांचे नाव प्रकाश वायंगणकर असून, ते व्यवसायाने गायक आहेत. मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली तेजस्विनीने इंजिनियर म्हणून कामाला सुरुवात केली होती. मात्र, अभिनयाच्या ओढीने ती मनोरंजनविश्वकडे वळली. ‘स्वरागिनी’, ‘खतारों के खिलाडी’, ‘बिग बॉस 15’ या टीव्ही मालिकांमध्ये ती झळकली आहे. तेजस्वीने '2612' या मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली 'खतरों के खिलाड़ी 10' व्यतिरिक्त ती 'किचन चॅम्पियन 5', 'कॉमिडी नाइट्स लाइव्ह', 'कॉमिडी नाइट्स विद कपिल' व 'कॉमिडी नाइट्स बचाओ' यांसारख्या शोमध्ये दिसली