दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा द राइज (Pushpa The Rise) या सिनेमाने बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सिनेमात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाने हिंदींत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. अल्लू अर्जनच्या 'पुष्पा' सिनेमाने सहाव्या आठवड्यात प्रभासच्या बाहुबली सिनेमाचे रेकॉर्ड मोडले आहेत. बाहुबली सिनेमाने हिंदीत 5.38 कोटींची कमाई केली होती. तर दुसरीकडे अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमाने सहाव्या आठवड्यात सहा कोटींची कमाई केली आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या पुष्पा सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पुष्पा' सिनेमातील डायलॉगलेखील प्रचंड व्हायरल होत आहेत.