रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या चित्रपटाचे शुटिंग थांबले आहे. युक्रेनमधील शूटिंगचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. उर्वशी गेल्या काही दिवसांपूर्वी युक्रेनमधील कीव्ह आणि ओडेसा येथे तिच्या आगामी तमिळ चित्रपटाचे शूटिंग करत होती. रशिया आणि युक्रेमधील तणावामुळे तेथील परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून उर्वशी मायदेशी परतली आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याच्या केवळ दोन दिवस आधी ती भारतात परतली आहे. दोन्ही देशांमधील हे युद्ध लवकरच संपेल आणि पुन्हा एकदा युक्रेनमध्ये काम सुरू करू करता येईल, अशी आशा उर्वशीने व्यक्त केली आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा परिणाम बॉलिवूडवरही होऊ लागला आहे. युक्रेन आणि रशियामध्ये अनेक भारतीय चित्रपट, वेब सीरिज आणि मालिका शूट झाल्या आहेत. बॉलिवूडसाठी दोन्ही देश शूटिंगची आवडती ठिकाणे आहेत. दोन्ही देशांतील युद्धामुळे भारतीय चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे